आज ८ मार्च रोजी साखळी बु. येथे रक्तदान शिबिर संपन्न झाले.

माझ्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिर पंधरवड्यांतर्गत आज ८ मार्च रोजी साखळी बु. येथे रक्तदान शिबिर संपन्न झाले. ४५ दात्यांनी रक्तदान करीत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

माझ्या सहकाऱ्यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिर पंधरवड्यांतर्गत दररोज शिबिरे होताहेत. सर्वत्र भरभरुन प्रतिसाद मिळतोय. आज साखळीचे ग्रा. पं. सदस्य तथा व्यावसायिक विलासभाऊ रत्नपारखी आणि सौ. ज्योतीताई रत्नपारखी या जोडीने रक्तदान करुन नवा आदर्श ठेवला. या रक्तदान शिबिर पंधरवड्यात पती आणि पत्नी दोघांनी एकत्रित रक्तदान केल्याची ही पहिलीच वेळ आहे.

आज जागतिक महिला दिन आहे. महिला दिनी ज्योतीताई रत्नपारखी आणि उषाताई गोरे या दोन भगिनींनी रक्तदान केले. ज्योतीताई गृहिणी असून उषाताई अंगणवाडी सेविका आहेत. दोघी भगिनींनी दिलेली वाढदिवसाची अनोखी भेट मला भावी कार्यास बळ देणारी ठरली. दोघी भगिनींसह समस्त महिलांना जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...!

img 1 (8)

Project Information

Client:

The Sixmothers Group

Location:

Philadelphia, United States

Date:

February 14, 2021

Website:

www.clientwebsite.com

Interested