शालेय वुशू मार्शल आर्ट स्पर्धेत चमकदार कामगिरी करीत
रेवा वसे या खेळाडूने विभागस्तरावर झेप घेतली आहे.
यापूर्वी सुद्धा राज्यस्तरीय वुशू क्रीडा स्पर्धेत तिने ब्रॉंझ पदक मिळवलेले आहे. जिल्हा वुशू असोशिएशनचा अध्यक्ष या नात्याने या गुणी खेळाडूचा सत्कार करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. जिल्हा प्रशिक्षक श्री. अंबुसकर सर यांचाही सत्कार करुन अभिनंदन केले.
जाहीरनामा जनतेचा हा कार्यक्रम घेऊन आपण जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांपर्यंत जात आहोत. विकासाच्या बाबत जनता जनार्दनाच्या भावना, त्यांची मते जाणून घेत आहोत. राजकीय पक्ष आपला जाहीरनामा मांडतात. वन बुलढाणा मिशनच्या माध्यमातून आपण जनतेचा जाहीरनामा मांडणार आहोत. यानुषंगाने आयोजित आतापर्यंतच्या सर्वच संवाद मेळाव्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय. याचा अर्थ जनता विकासाच्या बाजूच्या आहे, यात शंका नाही.
वुशू मार्शल आर्ट हा लोकप्रिय क्रीडाप्रकार आहे. ऑलम्पिक स्पर्धेत या खेळाचा समावेश आहे. जिल्हयातील खेळाडू यामध्ये प्राविण्य मिळवत आहेत. जिल्हा वुशू असोशिएशनचा अध्यक्ष म्हणून माझ्यासाठी ही अभिमानाची बाब आहे. युवतींसाठी स्वयंसंरक्षण म्हणून वुशु मार्शल आर्ट खेळ फायद्याचा असून त्यांनी या खेळाकडे वळावे. खेळाडूंना मार्गदर्शन आणि पाठबळ देण्यास आपण कटिबद्ध आहोत.