वन बुलढाणा मिशनच्या पिंपळगाव सराई येथील संवाद मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

वन बुलढाणा मिशनच्या पिंपळगाव सराई येथील संवाद मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लोकप्रतिनिधिंच्या भूलथापांचा जनतेला कंटाळा आलेला आहे.

त्यांच्या चेहऱ्यावर परिवर्तनाची, विकासाची आस दिसून येत आहे. येणाऱ्या काळात ही वज्रमुठ प्रस्थापितांना जोरदार ठोसा दिल्याशिवाय राहणार नाही,असा विश्वास आहे.

जाहीरनामा जनतेचा हा कार्यक्रम घेऊन आपण जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांपर्यंत जात आहोत. विकासाच्या बाबत जनता जनार्दनाच्या भावना, त्यांची मते जाणून घेत आहोत. राजकीय पक्ष आपला जाहीरनामा मांडतात. वन बुलढाणा मिशनच्या माध्यमातून आपण जनतेचा जाहीरनामा मांडणार आहोत. यानुषंगाने आयोजित आतापर्यंतच्या सर्वच संवाद मेळाव्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळालाय. याचा अर्थ जनता विकासाच्या बाजूच्या आहे, यात शंका नाही.

कुठलेही ग्रामपंचायत प्रशासन तळमळीने काम करते. त्यांच्याकडे आलेला निधी विकासाच्या योजनांसाठी वापरण्यात येतो. मात्र निधी देणारे लोकप्रतिनिधी यांनी हात आखडता घेऊ नये. निधी खेचून आणणे, ग्रामपंचायतीला देणे त्यांच्या हातात आहे. तेंव्हा जनतेने लोकप्रतिनिधींना जाब विचारायला हवा. आमच्या निधीचे काय झाले..? अशी विचारणा केली पाहिजे. ग्रामपंचायतीला नावे ठेवून जमणार नाही.

सर्वधर्मीय श्रद्धास्थान सैलानी बाबाचा संदल पिंपळगाव सराई येथून निघतो. लाखो लोक दर्शनासाठी येतात. सुविधा काय आहेत, काहीच नाही. आजपर्यंत साधा संदल रस्ता झाला नाही. शेतरस्त्यांच्या नावाखाली भरमसाठ निधी येतो. हा निधी जातो कुठे..? कधी विचारलेय आपण प्रश्न.? मायबापहो जागे व्हा, अजून वेळ गेलेली नाही...