वन बुलढाणा मिशनच्या जाहीरनामा जनतेचा कार्यक्रमांतर्गत दुसऱ्या टप्प्यातील संवाद मेळाव्याला रोहिणखेड (ता. मोताळा) येथून रविवारी प्रारंभ झाला. ग्रामस्थ आणि परिसरातील नागरिकांशी जिल्ह्याच्या विकासाबाबत हितगुज केले.

रोहिणखेडला ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेली आहे. हजार वर्षे जुन्या वास्तू इथे आहेत. कौमी एकतेची ही भूमी आहे. सर्वधर्म समभाव जपणारी ही भूमी आहे. वैभवशाली इतिहास असलेल्या या गावातील नागरिकांशी संवाद साधतांना मनाला आनंद झाला.

वन बुलढाणा मिशन ही राजकीय लोकचळवळ आहे. जिल्ह्याच्या विकासाचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी आपण सर्वजण एकत्र काम करतो आहोत. आपल्या पाठबळामुळे मला भविष्यातील आशादायी चित्र दिसत आहे. येणाऱ्या काळातील परिवर्तनाचे आपण साक्षीदार व्हावे, असे आवाहन करतो.

कोल्हापुरात लोकराजा छत्रपती शाहू महाराजांचा वारसा तेथील लोकप्रतिनिधींनी जपला. विकासात तो जिल्हा आघाडीवर आहे. बारामती, पुणे, सातारा, सांगलीचा विकास झाला. मग आपल्या बुलढाणा जिल्ह्याचा का होऊ शकत नाही..? आपल्या जिल्ह्याला तर राष्ट्रमाता जिजाऊंचा वारसा आहे. त्यासाठी प्रबळ राजकीय इच्छाशक्ती पाहिजे. आपण मला साथ द्या. नक्कीच कायापालट होईल,असा विश्वास देतो.