रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त वन बुलढाणा मिशनच्यावतीने २२ जानेवारी रोजी मातृतीर्थ सिंदखेड राजा ते संतनगरी शेगाव 'श्रीराम वंदना यात्रा' काढण्यात आली.

जिल्हावासीयांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. जागोजागी माता-भगिनींनी औक्षण केले. रांगोळीची सजावट, स्वागत पोस्टर्स, पुष्पवृष्टी पाहून भारावलो.

जिल्हावासीयांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. जागोजागी माता-भगिनींनी औक्षण केले. रांगोळीची सजावट, स्वागत पोस्टर्स, पुष्पवृष्टी पाहून भारावलो. पहाटे साडेसहा वाजता निघालेल्या यात्रेचा रात्री साडेअकरा वाजता शेगावच्या राम मंदिरात समारोप झाला.

सिंदखेड राजा, किनगाव राजा, दुसरबीड, बीबी, वीरपांग्रा, शेंदुर्जन, साखरखेर्डा, लव्हाळा, मंगरुळ, उदयनगर, खामगाव, शेगाव या मार्गाने श्रीराम वंदना यात्रा काढण्यात आली. जागोजागी स्वागतासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. आकर्षक सजावट केलेल्या रथावर श्रीरामांची भव्य मूर्ती ठेवण्यात आली होती. इंडियन आयडॉल फेम गायक राहुल खरे यांनी मंजुळ स्वरात एकाहून एक सरस गीते सादर केली. रामभक्तांनी जय श्रीरामच्या जयघोषाने परिसर दणाणून सोडला होता.

बुलढाणा जिल्ह्याला मोठा ऐतेहासिक आणि अध्यात्मिक वारसा आहे. राष्ट्रमाता जिजाऊंचा जिल्हा आहे. जागतिक लोणार सरोवर आहे. संत गजानन महाराज, संत चोखामेळा जिल्ह्यातील आहेत. तरी जिल्ह्याला मागासलेले म्हटल्या जाते. ही गोष्ट मनाला खटकते. वन बुलढाणा मिशन ही जिल्ह्याच्या विकासाची चळवळ आहे. प्रभू श्रीराम वंदना यात्रेच्या निमित्ताने जिल्ह्यात विकास आणि मांगल्य यावे याकरिता प्रभू श्रीरामांना साकडे घातले.