बुलढाणा येथील निवांत लॉन्स येथे २६ नोव्हेंबर रोजी आयोजित वन बुलढाणा
मिशनच्या बूथ कमिटी मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
पाच हजार नागरिकांच्या उपस्थितीत यावेळी ५०० गावांतील बुथ बांधणीला सुरुवात करण्यात आली. कोणतेच पक्षीय पाठबळ नसतांना हे शिवधनुष्य पेलता आले, हा जनता जनार्दनाचा आशीर्वाद आहे.
जिल्ह्यात अनेक समस्या असून त्यांची सोडवणूक लोकप्रतिनिधींना करता आलेली नाही. भूलथापांना जनता कंटाळली आहे. जिल्हावासीयांना सर्वच क्षेत्रात विकास हवा आहे. विकासासाठी जिल्ह्यात परिवर्तन होणारच, असा विश्वासच जणू जिल्हयातील नागरिकांनी यामाध्यमातून आज दिला.
जिल्ह्यातील नेत्यांनी अनेक मंत्रीपदे भूषवली. मात्र विकासाच्या बाबतीत आजही आपला जिल्हा पिछाडीवर आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या नेत्यांनी गाव, खेडी विकासाच्या प्रवाहात आणली. आपल्या जिल्ह्यात सुद्धा ही बाब शक्य होऊ शकते. त्यासाठी राजकीय इच्छाशक्ती हवी आहे. वन बुलढाणा मिशन ही लोकचळवळ आगामी काळात ही उणीव भरुन काढेल. जनतेने खंबीरपणे पाठीशी उभे राहावे.
बूथ बांधणी कमिटी हा तसा राजकीय पक्षाचा विषय आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्ष बूथ बांधणीला प्रथम प्राधान्य देतात. त्यांच्याकडे पक्षीय पाठबळ, पक्षाचे कार्यकर्ते असतात. मात्र वन बुलढाणा मिशनकडे जनतेचे पाठबळ आहे.. मेळावा यशस्वी करणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार...