जागतिक तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक

जागतिक तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत भारताची मान उंचावणारा आपल्या बुलढाण्याचा युवा खेळाडू प्रथमेश जवकारचा आज त्याच्या निवासस्थानी जाऊन सत्कार केला. तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

शांघाई (चीन) येथे झालेल्या जागतिक तिरंदाजी स्पर्धेत भारताकडून खेळण्याचा मान प्रथमेशला मिळाला. संधीचे सोने करीत त्याने सुवर्णपदक पटकावले. विश्वविजेत्या नेदरलॅंडच्या माइक श्लोएसरवर प्रथमेशने मात केली. पुरुषांच्या कपाऊंड प्रकारात त्याने वैयक्तिक गटात सुवर्ण पदक जिंकले. प्रत्येक भारतीयाने हा क्षण आपल्या नजरेत साठवून ठेवलाय. आपल्या बुलढाण्याचे नाव सातासमुद्रापार पोहचणाऱ्या या गुणी खेळाडूला भेटून, बोलून खूप आनंद झाला. खऱ्या अर्थाने ही गुणी पोरं बुलढाण्याचे वैभव आहेत.

आगामी स्पर्धेच्या तयारीसाठी रवाना होण्याआधी प्रथमेशची भेट घेऊन त्याला शुभेच्छा दिल्या. यावेळी शैलेशकुमार काकडे, रवींद्र काकडे, शरद मोहिते यांची उपस्थिती होती.

gold

Project Information

Client:

The Sixmothers Group

Location:

Philadelphia, United States

Date:

February 14, 2021

Website:

www.clientwebsite.com

Interested