अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्यासह इतर मागण्यांसाठी
आज मातृतीर्थ सिंदखेड राजा नगरीत वन बुलढाणा मिशनच्यावतीने जनआंदोलन करण्यात आले.

अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरपाई देण्यासह इतर मागण्यांसाठी आज मातृतीर्थ सिंदखेड राजा नगरीत वन बुलढाणा मिशनच्यावतीने जनआंदोलन करण्यात आले.

राजवाडा येथे राजमाता जिजाऊ यांना अभिवादन करुन राजवाडा ते तहसील रॅली काढण्यात आली. तिथे रॅलीचे सभेत रुपांतर झाले. उपस्थित हजारो शेतकऱ्यांना संबोधित केले. शासनाने केवळ आश्वासने देऊन चालणार नाही. शेतकऱ्यांना तत्काळ भरघोस मदत द्यावी. अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान केले आहे. या संकटातून सावरण्यासाठी त्यांना पाठबळ देण्याची गरज आहे. बागायतीला एकरी ५०, कोरडवाहू एकरी २५ हजार तत्काळ मदत द्यावी, अवकाळीचे त्वरित पंचनामे करावे, सोलर पॅनल नुकसानीसाठी १ लाख अतिरिक्त मदत द्यावी, शेडनेट नुकसानीचा एनडीआरएफमध्ये समावेश झाला पाहिजे, प्रत्येक शेडनेट नुकसानग्रस्त शेतकऱ्यास १ लाख रुपये द्यावे, आदी मागण्या शासनाकडे लावून धरल्या आहेत. वन बुलढाणा मिशनच्या माध्यमातून याबाबत सातत्याने पाठपुरावा सुरु ठेवणार आहे.

सिंदखेड राजा आणि तालुक्यात शेडनेटला फटका बसला आहे. शेडनेट उभारणीसाठी लाखो रुपये लागतात. अवकाळीने शेडनेट मातीमोल केले आहे. शासनाने केवळ सानुग्रह अनुदान दिल्याने भागणार नाही. नुकसान झाले त्याप्रमाणे भरपाई दिली पाहिजे.

मोर्च्यात शेतकरी नेते दिलीप चौधरी, सोपान चव्हाण, सुदाम चव्हाण, निलेश बंगाळे, जनार्दन चित्तेकर, विठ्ठल कापसे, कैलास मेहेत्रे, वसंता राठोड यांनीही विचार मांडले. आमच्या आवाहनाला प्रतिसाद देत सहभागी झालेल्या सर्वांचे मनापासून आभार....