अंढेरा (ता. देऊळगाव राजा) येथे आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन केले. क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला व खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

सध्या क्रिकेट विश्वकपचा फिव्हर सुरु आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघ उत्तम कामगिरी करीत आहे. भारताने ही स्पर्धा जिंकावी अशी क्रिकेटप्रेमींची इच्छा आहे.

खामगावला आपण सिल्व्हर सिटी म्हणतो. वऱ्हाड आणि सोन्याची कुऱ्हाड असे म्हटले जाते. देशातली एक नंबरची कापसाची ही बाजारपेठ होती. सुवर्णकाळ अनुभवलेला आपला जिल्हा आहे. हे वैभव आपणास परत मिळवायचे आहे. याकरिता सर्वांनी मिळून काम करुया. सिंचनाचा प्रश्न मार्गी लागला पाहिजे. जिल्ह्यात चांगल्या एमआयडीसी उभ्या राहिल्या पाहिजेत. युवकांच्या हाताला काम मिळायला हवे. बोरी आडगावचे भविष्यात बुट्टीबोरी का होऊ शकत नाही? नक्कीच होऊ शकते, याकरिता आपणास प्रयत्न करायचे आहेत.

अंढेरा येथे आयोजित क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन केले. खेळीमेळीच्या वातावरणात ही स्पर्धा व्हावी आणि यामाध्यमातून गुणी खेळाडू समोर यावेत अशी सदिच्छा व्यक्त केली. यावेळी आयोजक आशिष सानप, अक्षय तेजनकर, ब्रम्हा नागरे, ज्ञानेश्वर ढाकने, विशाल नागरे, अक्रम शाह यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.