आज ८ मार्च रोजी साखळी बु. येथे रक्तदान शिबिर संपन्न झाले.

माझ्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर पंधरवडा आयोजित करण्यात आला आहे. राजर्षी शाहू सोशल फाऊंडेशन आणि राजर्षी शाहू मल्टिस्टेटने हे शिवधनुष्य उचलले आहे. आज यानुषंगाने डोंगरखंडाळा येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. तब्बल १११ युवकांनी रक्तदान केले. उन्हाळ्याचे दिवस असतांनाही रक्तदान शिबिरास मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद भारावणारा आहे.

डोंगरखंडाळा गावाशी माझे अतूट नाते. माझं बालपण इथेच गेले. इथेच मी लहानाचा मोठा झालो. जिवाभावाची मित्रमंडळी मिळाली. संस्कार घडले. माझ्या जडणघडणीत डोंगरखंडाळाचा वाटा मोठा आहे. गावच्या मातीत अदभुत शक्ती आहे. मला इथून सतत प्रेरणा मिळते. प्रत्येक संकटात गावाने भक्कम साथ दिलीय. भविष्यातही हे प्रेम असेच कायम राहील याबाबत माझ्या मनात शंका नाही.

आजच्या रक्तदान शिबिर प्रसंगी मंजुबाई गाडगे,अनंतराव पाटील, रमेश सावळे, वामनराव पाटील, निंबाजी पाटील, येडुबा काकडे, प्रभाकर सावळे, किशोर सेठ, मयूर बाहेकर, अशोक सावळे, राम सावळे, लक्ष्मण सावळे, राम देहाडराय, वसंता सावळे, शाम सावळे ( उपसरपंच डों. खंडाळा ), गजानन इंगळे , योगेंद्र सावळे, रवींद्र सावळे, राजर्षी शाहू फाउंडेशनचे शैलेशकुमार काकडे, दीपक महाराज सावळे, संजय लोखंडे, शरद मोहिते, रवी काकडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार...!

donation

Project Information

Client:

The Sixmothers Group

Location:

Philadelphia, United States

Date:

February 14, 2021

Website:

www.clientwebsite.com

Interested