राजर्षी शाहू मल्टीस्टेट द्वारा आयोजित क्रांती नाना मळेगावकर यांचा न्यू होम मिनिस्टर कार्यक्रम

मल्टिस्टेट फेडरेशनचा '#सहकारगौरव' पुरस्कारप्राप्त राजर्षी शाहू मल्टिस्टेटद्वारा २४ जानेवारी क्रांती नाना मळेगावकर यांच्या न्यू होम मिनिस्टर (खेळ पैठणीचा) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. बुलडाणेकर भगिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेत कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेतला. विविध खेळ, गप्पा-गोष्टी, मनमोकळा संवाद, उखाणे, डान्स सादर करीत आपल्यातील सुप्त गुणांचा परिचय दिला.

जिजामाता व्यापारी क्रीडा संकुलचे भव्य मैदान महिलांच्या भरगच्च उपस्थितीने फुलून गेले होते. विविध रंगी लाईटस आणि डीजेच्या आवाजाने परिसर संगीतमय झाला. अशावेळी महिलांची पाऊले थिरकणार नाही तर नवल. लावणी क्वीन विजयाताई पालव यांच्या एकाहून एक सरस लावणींनी कार्यक्रमास चार चाँद लावले.

आमच्या होम मिनिस्टर सौ. मालती आणि तिच्या टीमने कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले. त्यासाठी खरंच करावे तितके कौतुक कमीच आहे. खास महिलांसाठी एक उत्तम कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आणि त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवल्याबद्दल खूप अभिनंदन. Iam proud of you... go ahed..
https://youtu.be/0SdPnfl0dE0

Related Posts