राजर्षी शाहू परिवार आणि वन बुलढाणा मिशनच्यावतीने माझ्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान महायज्ञाचा मलकापूर, मोताळा आणि माहोरा येथून शुभारंभ झाला. तीनही शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मलकापूर २५, मोताळा १०२ आणि माहोऱ्यात ५६ जणांनी रक्तदान केले. पहिल्याच दिवशी तब्बल १८३ बॉटल्स रक्त संकलित झाले. 

 

निमित्त कुठले ही असो उद्देश प्रामाणिक असावा. आपण रक्तदान महायज्ञ आयोजित केला आहे. यामाध्यमातून संकलित होणारे रक्त गरजू रुग्णांसाठी जीवनदान ठरेल. आज २५ जानेवारीपासून सुरु झालेली रक्तदान शिबिरे १३ मार्चपर्यंत चालणार आहेत. गतवर्षी आपण तीन हजार बॉटल रक्त संकलित केले होते. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये याची नोंद झालेली आहे. ही निश्चितच अभिमानाची बाब आहे. यावर्षी आपणच आपले रेकॉर्ड मोडून नवीन उच्चांक गाठण्याचा प्रयत्न राहील. तसा संकल्प सहकाऱ्यांनी केला आहे. निरोगी समाजाचे स्वप्न साकार करण्याच्या प्रांजळ उद्देशाने एकत्र येण्याचा संकल्प करणाऱ्या रक्तदात्यांचे आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांचे अभिनंदन...

Related Posts