आषाढी एकादशीनिमित्त आज सकाळी वाघजाळ (ता.मोताळा) येथील विठ्ठल रुख्मिनी संस्थानमध्ये आरती करुन दर्शन घेतले.

बुलढाणा येथील आराध्या लॉन्स येथे विठ्ठलाच्या प्रतिमेचे पूजन करुन आशीर्वाद घेतले. भाविकांना फराळाचे वाटप केले.

सकाळपासून आकाशात ढगांची गर्दी झाली असून पावसाला सुरुवात झाली आहे. तुरळक का होईना अनेक ठिकाणी पाऊस पडतोय. वाघजाळ संस्थानमध्ये आरती करुन पांडुरंगाकडे भरपूर पाऊस पडू दे, असे साकडे घातले.

यावेळी गुरुवर्य वासुदेव महाराज शास्त्री, कडुबा गाडेकर,मनोहर शिंबरे, संजय भारसाकडे, श्रीकृष्ण खराटे(मुर्ती सरपंच), पुंजाजी शिंबरे(वाघजाळ सरपंच), राजेंद्र शिंबरे, बाळु खाकरे, विष्णु वाघ, वैभव चव्हाण, प्रवीण शिंबरे, प्रल्हाद राऊत, गणेश इंगळे, प्रशांत राजपूत, दत्ता पाटील यांच्यासह परिसरातील भाविक भक्त उपस्थित होते.

Related Posts