व्हॉईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंगचे राज्य अधिवेशन आज छत्रपती संभाजीनगरातील एमजीएम कॅम्पसमध्ये संपन्न झाले. या अधिवेशनाचे उदघाटन करण्याचा बहुमान मिळणे ही माझ्यासाठी मोठी उपलब्धी आहे.

पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. दबलेल्या, पिचलेल्या, वंचित घटकांची बाजू मांडण्याचे काम पत्रकार बांधव करतात. अनेक संकटांचा, अडचणींचा सामना त्यांना करावा लागतो. व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेने पत्रकारांसाठी सुरु केलेले कार्य मला नेहमीच भावते. यापुढील काळात व्हॉईस ऑफ मीडिया व्हॉईस ऑफ पीपल, व्हॉईस ऑफ डेमोक्रॅसी बनली पाहिजे, हीच सदिच्छा..

लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांनी पुरोगामी पत्रकारितेला बळ दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूकनायक वृत्तपत्रास शाहू महाराजांनी अर्थसहाय्य केले. अशी इतरही अनेक उदाहरणे देता येतील. बहुजन समाजातील संपादकांची वृत्तपत्र आर्थिक स्पर्धेत टिकावी याकरिता शाहू महाराजांनी प्रयत्न केले. लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांचा वारसा घेऊन चालणारा राजर्षी शाहू परिवार कायम पत्रकारांच्या पाठीशी उभा राहिला आहे, हे सांगतांना मला आनंद होतोय.

व्हॉईस ऑफ मीडियाने पत्रकारितेतील सर्व घटकांना (विंग) सोबत घेऊन स्वीकारलेल्या सर्वसमावेशक धोरणाचे मी अभिनंदन करतो. तदवतच आमच्या बुलढाणा जिल्ह्याला अनिलजी म्हस्के आणि विनोदजी बोरे यांच्या रुपाने राज्यस्तरीय नेतृत्व करण्याची संधी दिली त्याबद्दल संस्थापक अध्यक्ष संदीपजी काळे यांचे आभार मानतो.

Related Posts