Blood Donation Camp

राजर्षी शाहू मल्टिस्टेट आणि राजर्षी शाहू सोशल फाऊंडेशनच्यावतीने माझ्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे. यानुषंगाने रविवारी २६ फेब्रुवारी रोजी शिरपूर येथील शिबिरात २५ जणांनी रक्तदान केले.

शिरपूर हे माझं मूळ गाव. गावची माती गावची माणसं माझ्यावर नेहमीच भरभरुन प्रेम करतात. सतत प्रोत्साहन, पाठिंबा देतात. त्यामुळे कुठलंही कार्य करतांना आधार वाटतो. रविवारी रक्तदान शिबिरानिमित्त ज्येष्ठ मंडळींची भेट झाली. मनाला खूप आनंद वाटला. रक्तदान शिबिर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार...!

क्तदान चळवळीत काम करतांना अनेक प्रेरणादायी माणसं भेटतात. आज किरण थोरात यांची भेट झाली. ते व्यवसायाने शिक्षक आहेत. त्यांची आज रक्तदान करण्याची ९६ वी वेळ आहे. जागतिक रेकॉर्ड मोडण्याचा त्यांचा मानस आहे. या भारावलेल्या व्यक्तिमत्वासोबत भेट झाल्यावर सेल्फीचा मोह आवरला नाही.

Related Posts