सहकारगौरवपुरस्कार

फेडरेशन ऑफ मल्टिस्टेट को- ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. पुणे मार्फत दिला जाणाऱ्या #सहकारगौरवपुरस्कार २०२२ करिता 'सर्वोत्कृष्ट संस्था' म्हणून राजर्षी शाहू मल्टिस्टेट को. ऑप क्रेडिट सोसायटीला सन्मानित करण्यात आले. शिर्डी येथील पुष्पक रिसॉर्टमध्ये १३ जानेवारी रोजी एका शानदार सोहळ्यात संस्थाध्यक्ष मालती शेळके, सरव्यवस्थापक नितीन उबाळे यांच्यासह हा पुरस्कार स्वीकारला. संस्थापक अध्यक्ष या नात्याने माझ्यासाठी ही अभिमानाची बाब आहे.

मल्टिस्टेट फेडरेशनचे अध्यक्ष सुरेश अण्णा वाबळे, सहकार भारतीचे महामंत्री उदय जोशी, महाराष्ट्र राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे, बुलडाणा अर्बनचे चीफ मॅनेजिंग डायरेक्टर डॉ.सुकेश झंवर यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्काराचे वितरण झाले.

जिल्ह्यातील जनतेने सहकारी चळवळीवर विशेषतः सहकारी पतसंस्था, सहकारी बँकांवर नेहमीच प्रचंड विश्वास ठेवला आहे. त्यामुळे हा पुरस्कार सहकार चळवळ जिवंत ठेवणाऱ्या जिल्ह्यातील जनतेला आणि राजर्षी शाहू परिवारातील सर्व सभासदांना समर्पित करतो.

Related Posts