‘एक जिल्हा, एक आवाज, एक संकल्प’ 

वन बुलडाणा मिशन' म्हणजे नेमके आहे तरी काय? हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ अवश्य बघा. बुलडाणा जिल्ह्याच्या विकासासाठी हे मिशन एक लोक चळवळ असणार आहे. 'एक जिल्हा, एक आवाज, एक संकल्प' अशा निर्धाराने या मिशनमध्ये सहभागी व्हा.

लोकांच्या मनात 'वन बुलढाणा मिशन'बद्दल अनेक प्रश्न आहेत. मला अभिमानाने सांगायला आवडेल की, ही एक लोकचळवळ आहे. जिल्ह्याच्या विकासात सर्व घटकांना सामावून घेण्यासाठी ही चळवळ काम करणार आहे. शेतकरी, कष्टकरी, युवक, विद्यार्थी, सैनिक, उद्योजक, महिला बचतगट अशा सर्वांसाठीच आपण काम करणार आहोत. आपल्याला विकसित जिल्हा म्हणून आपली ओळख निर्माण करायचीय. तुम्ही साथ द्या, निश्चित बदल घडेल याविषयी माझ्या मनात शंका नाही.

शेतकऱ्यांना मूळ किंमतीत थेट बांधावर खत उपलब्ध करण्यासाठी राजर्षी शाहू सोशल फाऊंडेशनचे माझे सर्व शिलेदार मेहनत घेताहेत. उन्हाचा पारा चढतोय. स्वतःची काळजी घ्या. आपले ध्येय गाठण्यासाठी आरोग्य जपणे तितकेच महत्वाचे आहे. माझ्या शेतकरी बांधवाना सुद्धा तब्येतीची काळजी घेण्याचे आवाहन करतो.

one mission buldhana

Related Posts