जिजाऊ ज्ञान मंदिर पळसखेड भटच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत सुवर्ण कामगिरी…!!

राजर्षी शाहू चॅरिटेबल ट्रस्ट सुंदरखेड बुलढाणा द्वारा संचालित जिजाऊ ज्ञान मंदिर स्कूल अँड ज्यु कॉलेज पळसखेड भट च्या विद्यार्थ्यांनी बारामती येथे झालेल्या अखिल भारतीय राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत बुलडाणा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करत पाच सुवर्ण पदक मिळवले. तसेच अखिल भारतीय राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धा गोवा साठी मुलांची निवड झाली आहे.

दिनांक 1 ऑक्टोबर 2021 रोजी बारामती येथे स्पर्धा आयोजित करण्यात आली होती, या स्पर्धेसाठी जिजाऊ ज्ञान मंदिर आणि ज्युनियर कॉलेज पळसखेड भटचे पाच विद्यार्थी सहभागी झाले होते. या स्पर्धेमध्ये एकूण 36 जिल्ह्यातील स्पर्धक सहभागी झाले होते. यामध्ये बुलढाणा जिल्ह्याने मानाचा तुरा रोवत 26 पदक मिळवीत अव्वल स्थान पटकावले. यात विवेक अरुण जाधव, रितेश अरुण फोलाने,कु. सृष्टी किरण मोरे, आशिष रमेश दांडगे, शिवम नारायण उबाळे या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत सुवर्ण पदक मिळवून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

या सर्व खेळाडूंच्या सत्काराचे आयोजन राजर्षी शाहू चारीटेबल ट्रस्ट सुंदरखेड बुलढाणा संस्थेच्या वतीने बुलडाणा रेसिडेन्सी क्लब येथे करण्यात आले होते. या भव्य स्वागत समारोहासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री संदीप पंडीत अध्यक्ष मातोश्री अर्बन बँक धाड,शिवव्याख्याते श्री.कृष्णा पाटील इंगळे, ॲड.सागर पाटील लोखंडे, हायकोर्ट औरंगाबाद. ॲडव्होकेट बनकर साहेब, हायकोर्ट औरंगाबाद, श्री. ऋषी म्हस्के आदींची उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते सर्व खेळाडूंचे स्वागत करण्यात आले व पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Related Posts