राजर्षी शाहू मल्टिस्टेट को. ऑप क्रेडिट सोसायटीच्या सिंदखेड राजा शाखेचा शुभारंभ झाला.

राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या जन्मोत्सवाच्या पर्वावर १२ जानेवारी रोजी राजर्षी शाहू मल्टिस्टेट को. ऑप क्रेडिट सोसायटीच्या सिंदखेड राजा शाखेचा शुभारंभ झाला. राष्ट्रमाता जिजाऊंच्या जयंतीदिनी ऐतिहासिक मातृतीर्थ नगरीतील शाखेचे उदघाटन झाले याचा विशेष आनंद आहे.

राजर्षी शाहू परिवाराचे संस्थापक आमचे आधारवड आदरणीय भाऊसाहेब शेळके, पितृस्थानी असलेले मोठे बंधू तथा मार्गदर्शक अभिता कंपनीचे संस्थापक आणि सीईओ सुनीलदादा शेळके यांच्या विशेष उपस्थितीत आणि नगराध्यक्ष सतीशभाऊ तायडे यांच्या हस्ते उदघाटन झाले. यावेळी दिशा बुलडाणा जिल्हा महिला बचतगट फेडरेशनच्या संस्थापक अध्यक्षा जयश्रीताई शेळके, संस्थाध्यक्षा मालती शेळके, संस्थेच्या संचालिका सुरेखाताई तायडे, अर्चनाताई शेळके ह्या कुटुंबातील सदस्यांची लाभलेली उपस्थिती बळ देणारी ठरली.

याप्रसंगी नगरपालिकेचे उपाध्यक्ष भिमाभाऊ जाधव, राजे लखुजीराव जाधव यांचे वंशज शिवाजीराजे जाधव, माजी नगराध्यक्ष देविदास ठाकरे, छगनदादा मेहेत्रे, विष्णू मेहेत्रे, न. प. माजी उपाध्यक्ष दिलीपराव आढाव, माजी नगरसेवक महेश जाधव, न.प. अर्थ व बांधकाम सभापती गणेश झोरे, आरोग्य सभापती भिवसन ठाकरे, पाणीपुरवठा सभापती बालाजी मेहेत्रे, नगरसेवक त्र्यंबकराव ठाकरे, नगरसेविका दीपालीताई म्हस्के, आशामतीताई मेहेत्रे, ज्योतीताई म्हस्के, नंदाताई मेहेत्रे, सुमनताई खरात, सिंधुताई ठाकरे, चंद्रकलाताई तायडे, सारिकाताई म्हस्के, नगरसेवक रुखमन तायडे, राजेश आढाव, राजेश बोंद्रे, हाझरानुझहत काझी, शे. अजीम शे. गफार, बबन म्हस्के, भगवानराव सातपुते, डॉ. भीमराव म्हस्के, अमोल ठाकरे, डॉ. दत्तात्रय बुरुकुल, शाहीर रामदास कुरंगळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहिले याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.

Related Posts